राज्यासह परराज्यांतील ड्रग्जविक्रेत्यांच्या संपर्कात?

राज्यासह परराज्यांतील ड्रग्जविक्रेत्यांच्या संपर्कात?
Published on

राज्यासह परराज्यांतील ड्रग्जविक्रेत्यांच्या संपर्कात?

अश्‍विनी पॉलबाबत पाेलिसांना संशय; संभाषणासाठी इंटरनेट कॉलिंग

मुंबई, ता. २० : गोरेगावच्या नेस्को येथील कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज प्रकरणामध्ये टिटवाळा येथून अटक केलेली ड्रग्ज वितरक अश्‍विनी पॉल हिचा मुंबई महानगर प्रदेशसह पुणे, नागपूर आणि नाशिक तसेच परराज्यांतील अंमली पदार्थ विक्रेत्यांशी संपर्क असल्याचा संशय पाेलिसांनी व्‍यक्त केला आहे. तिच्याकडे चार मोबाईल आणि आठ सिम कार्ड सापडले असून ती संभाषणासाठी इंटरनेटचा वापर करत असल्याचे उघड झाले आहे. यासाठी ती व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट, इंस्टाग्राम, फेसबुकसह अन्य ॲप वापरत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी टिटवाळ्यातील उच्चभ्रू पद्मावती सोसायटीतील अश्विनीच्या घरी छापा घालून सहा कोटी रुपये किंमत असलेल्या पाच हजार एक्स्टॅसी गोळ्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई उपआयुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अनिल ढोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. पोलिस तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी मूळची पुण्याची आहे. नववी पास असलेली अश्विनी पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत आली आणि बारबाला बनली. चार वर्षांपूर्वी तिच्या प्रियकराला एका गुन्ह्यात अटक झाली. त्याला भेटण्यासाठी ती कारागृहात जात हाेती. तेथे तिची प्रियकराच्या माध्यमातून इरफान अन्सारी याच्याशी ओळख झाली. केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) त्याला एक्स्टॅसी तस्करी प्रकरणात अटक केली होती. तीन वर्षांपासून कारागृहात बंद होता. इरफानने अश्विनीला अमली पदार्थांच्या व्यवसायात शंभर पटीहून अधिक नफा मिळतो. तसेच सुरक्षा यंत्रणांच्या नजरेतून सुटण्याकरिता महिलांना नैसर्गिक कवच लाभलेले असते. योग्य खबरदारी घेतल्यास कोट्यवधींचा नफा कमावता येऊ शकतो, असे पटवून दिले. वाढते वय, भविष्याचा विचार करून ती दोन वर्षांपूर्वी अमली पदार्थांच्या तस्करी, विक्रीत उतरल्याची माहिती पोलिसांनी दिली. इरफानच्या अटकेनंतर अमलीपदार्थ विरोधी पथकाला अश्विनीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार घातलेल्या छाप्यादरम्यान तिच्याकडे सापडलेल्या पाच हजार गोळ्यांचा साठा पाहून पथकातील अधिकाऱ्यांना धक्का बसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com