

मुंबईकरांनो, काळजी घ्या!
पुढील ४८ तास पावसासोबतच उकाडा वाढणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबईत सध्या उन्हाचा तडाखा जाणवत असतानाच आता मुंबईकरांना दुहेरी संकटांचा सामना करावा लागणार आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील दोन दिवस मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरात उष्ण आणि दमट हवामानासह हलक्या पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे वातावरणात प्रचंड उकाडा वाढून मुंबईकरांना घाम फुटणार आहे.
आर्द्रता वाढणार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २२ आणि २३ एप्रिलला मुंबईत दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे; मात्र या पावसामुळे गारवा मिळण्याऐवजी आर्द्रता वाढल्याने उकाडा अधिकच त्रासदायक ठरणार आहे.
२२ आणि २३ एप्रिलला पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तापमान वाढलेले नसले तरी ‘ह्युमिडिटी’ (दमटपणा) जास्त असल्याने अंगाची लाहीलाही होईल. ठाणे जिल्ह्यातही पावसाची शक्यता असून हवामान ढगाळ राहील. दुपारच्या वेळी ‘हॉट अँड ह्युमिड’ कंडिशनमुळे नागरिक त्रस्त होण्याची शक्यता आहे. तर पालघरमध्ये सुरुवातीला हवामान कोरडे असले तरी २४ तारखेपासून तिथेही पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दुपारी आणि संध्याकाळी ‘थंडरशॉवर’चा इशारा
आयएमडीच्या माहितीनुसार, दिवसा कडक ऊन पडेल आणि दुपारी किंवा संध्याकाळी ढग दाटून येतील. या काळात विजांच्या कडकडाटासह काही भागात पावसाच्या सरी कोसळतील. हे हवामान पुढील दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
......
नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना
१. आर्द्रता वाढल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते, त्यामुळे भरपूर पाणी प्यावे.
२. बाहेर जाताना डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करा.
३. विजांचा कडकडाट होत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात उभे राहू नका.
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.