तो आणायचा, ती विकायची!

तो आणायचा, ती विकायची!
Published on

तो आणायचा, ती विकायची!
अश्विनी पॉलचा प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ ः अमली पदार्थविरोधी पथकाने टिटवाळ्यातून एक्स्टॅसी वितरक अश्विनी पॉल हिला अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पथकाने अश्विनीचा प्रियकर आमिर सय्यद यास मंगळवारी कारागृहातून ताब्यात घेतले. आमिरच्या चौकशीतून त्याने एक्स्टॅसीचा साठा कोणाकडून, कसा मिळवला, याचा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आमिरला यापूर्वी कोकेनच्या साठ्यासह महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अटक केली होती. जामिनावर सुटताच त्याने पुन्हा अमली पदार्थांची तस्करी व विक्री सुरू केली; मात्र खटल्याच्या सुनावणीस सतत गैरहजर राहिल्याने फेब्रुवारी महिन्यात त्याचा जामीन रद्द झाला आणि डीआरआयने त्याला पुन्हा कारागृहात धाडले. जामिनावर असताना त्याने एक्स्टॅसीची ही खेप अश्विनीकडे विक्रीसाठी पोहोचवली होती. ही माहिती उघड होताच मंगळवारी अमली पदार्थविरोधी पथकाने आमिरचा ताबा घेतला. सुरक्षा यंत्रणांची नजर चुकवून हवाई, सागरी किंवा अन्य मार्गे भारतात आलेला साठा वाहकांमार्फत अश्विनीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमिरवर होती. पुढे या गोळ्यांची मागणीप्रमाणे विकण्याचे काम अश्विनी पार पाडत होती, अशी माहिती चौकशीतून पुढे आल्याचे समजते.
---
मालमत्तांची शोधाशोध
अश्विनीने अमली पदार्थविक्रीतून जमवलेल्या संपत्तीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. तसेच तिचे बँक व्यवहारही तपासले जात असल्याचे सांगण्यात आले.
----
कचऱ्याच्या डब्यात गोळ्या
अमली पदार्थविरोधी पथकाने टिटवाळा येथील पद्मावती सोसायटीत अश्विनीच्या घरी छापा घातला. घराचा कानाकोपरा शोधूनही हाती काहीच न लागल्याने कारवाई फोल ठरण्याची वेळ आली होती; मात्र अखेरच्या क्षणी एका कोपऱ्यात ठेवलेल्या कचऱ्याच्या डब्यावर पथकाचे लक्ष गेले. तो उघडताच सहा कोटींच्या एक्स्टॅसी गोळ्यांच्या पुड्या हाती लागल्या.
----
सर्वेक्षणाच्या निमित्ताने घराचा शोध
पद्मावती सोसायटीत अश्विनीचे नेमके घर कोणते, हे शोधण्यासाठी अमली पदार्थविरोधी पथकाने अनोखी शक्कल लढवली. शासकीय अधिकाऱ्यांच्या वेशात एका सर्वेक्षणाच्या नावाखाली पथकाने सोसायटीतील प्रत्येक घराचा कानोसा घेतला, असे सूत्रांनी सांगितले.
----
रुकसाना शेख नावाचा वापर
पोलिसांना अश्विनीकडे रुकसाना शेख नावाचे आधार कार्ड आणि अन्य ओळखपत्रे सापडली. त्यावरून या नावेही तिचा सर्वत्र वावर असावा, असा संशय पोलिसांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com