सीएसएमटी-नांदेड वंदे भारतला ‘नवा वेग’; ३ मेपासून बदललेले वेळापत्रक लागू!

सीएसएमटी-नांदेड वंदे भारतला ‘नवा वेग’; ३ मेपासून बदललेले वेळापत्रक लागू!
Published on

सीएसएमटी-नांदेड
वंदे भारतच्या वेळेत बदल
मुंबई, ता. २१ : मध्य रेल्वेने सीएसएमटी-नांदेड वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळेत बदल केला आहे. पूर्वी १.१० वाजता सुटणारी सीएसएमटी-नांदेड गाडी दुपारी १:१५ वाजता सुटेल आणि नांदेड येथे रात्री १०:२५ वाजता पोहोचेल. पूर्वी ती १०:५० वाजता पोहोचत होती. नांदेड-सीएसएमटी गाडी पूर्वी पहाटे ५ वाजता सुटत होती, आता ती ५:२० वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे गाडी दुपारी २:१५ वाजता पोहोचेल. पूर्वी ती २:२५ वाजता पोहोचत होती. ठाणे, कल्याण, नाशिक रोड आणि मनमाड येथील वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवे वेळापत्रक ३ मे २०२६ पासून लागू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com