

खेरनगर पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार पौष्टिक आहार
किशोरी पेडणेकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : खेरनगर महापालिका शाळेत शालेय पोषण आहाराचा दर्जा खालावल्याच्या तक्रारींची दखल घेत पालिका प्रशासनाने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना आता अक्षय चैतन्य आणि अक्षय पात्र या नामांकित संस्थांमार्फत पौष्टिक आहार पुरवण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे. माजी महापौर आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यामुळे मोठे यश मिळाले आहे.
खेरनगर इंग्रजी शाळा क्रमांक २ मधील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे माध्यान्ह भोजन दिले जात असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या होत्या. शाळेतील व्यवस्थापन समिती पालकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत असल्याचेही समोर आले होते. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत किशोरी पेडणेकर यांनी रोहिणी कांबळे आणि साईनाथ दुर्गे यांच्यासह शाळेला अचानक भेट दिली. या वेळी आहाराचा दर्जा, शिक्षकांची कमतरता आणि शालेय साहित्याचा अभाव पाहून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आहाराचा दर्जा त्वरित न सुधारल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या.
लवकरच अंमलबजावणी
पालिका आयुक्त आणि उपायुक्त डॉ. प्राची जांभेकर यांनी या प्रकरणाची दखल घेत विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे भोजन मिळावे, यासाठी अक्षय पात्रसारख्या अनुभवी संस्थांशी चर्चा केली. लवकरच या नव्या आहार योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी होणारी तडजोड थांबल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले असून, पेडणेकर यांनीही प्रशासनाचे आभार मानले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.