विनोद चवरे यांची पदोन्नती अखेर रद्द

विनोद चवरे यांची 
पदोन्नती अखेर रद्द
Published on

विनोद चवरे यांची
पदोन्नती अखेर रद्द

मुंबई, ता. २२ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नागपूर विभागाचे विभाग नियंत्रक (हंगामी) विनोद मारोतराव चवरे यांची पदोन्नती अखेर रद्द झाली. भ्रष्टाचार, न्यायालयीन प्रकरण आणि विभागीय चौकशी प्रलंबित असतानाही त्यांना दिलेल्या पदोन्नतीवर महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे (इंटक) सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार केली होती. गडचिरोलीत असताना एसीबीने चवरे यांना रंगेहाथ पकडले होते. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रकरण प्रलंबित आहे. चवरे यांनी अधिकार नसताना आर्थिक हितसंबंधातून कर्मचारी बदल्या करून एसटीला नुकसान केल्याची चौकशी सुरक्षा विभागाने सिद्ध केली. सरनाईक यांच्या निर्देशानुसार उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांनी पदोन्नती रद्द करून चवरे यांना पांढरकवडा येथील चालक प्रशिक्षण केंद्रात विभागीय वाहतूक अधिकारी पदावर पदावनत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com