मिठी नदीच्या ३० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

मिठी नदीच्या ३० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी
Published on

मिठी नदीच्या ३० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी
(मिठी नदीसाठी ३० कोटींचा प्रस्ताव मंजूर)
दरआठवड्याला गाळउपशाचा अहवाल सादर करा; स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : तीन टप्प्यांत मिठी नदीतील गाळउपसा करण्याच्या ३० कोटींच्या प्रस्तावाला बुधवारी (ता. २२) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली. दरम्यान, मिठी नदीतील गाळउपसा केल्याचा अहवाल दरआठवड्याला स्थायी समितीत सादर करण्यात यावा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले.
पवई ते शिक्षक काॅलनी, कुर्ल्यापर्यत मिठी नदीतील गाळउपसा करण्यात येणार आहे. यासाठी नऊ कोटी ४७ लाख ३९ हजार ३४६ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कुर्ला शिक्षक काॅलनी ते बीकेसी कनेक्टर पुलापर्यंत मिठी नदीतील गाळउपसा करण्यात येत आहे. यासाठी १० कोटी ४६ लाख नऊ हजार २०० रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तर बीकेसी कनेक्टर पूल, माहीम आऊट फाॅल आणि त्याच्या टेल चॅनेलपर्यंत मिठी नदीतील गाळउपसा करण्यात येणार आहे. यासाठी नऊ कोटी ८९ लाख १५ हजार १३१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला असता, सदस्यांनी मिठी नदीतील गाळउपसा करण्यावर प्रश्न उपस्थित केले.
मिठी नदीतील गाळउपसा करण्याचे काम दिलेल्‍या कंत्राटदाराला रस्त्यांचे डांबरीकरण करणे, संरक्षक भिंत बांधणे याचा अनुभव आहे. ऑऊट फाॅल खासगी जागेत असल्याने गाळ काढला जात नाही, असा मुद्दा ठाकरे सेनेच्या नगरसेविका स्थायी समिती सदस्या श्रद्धा जाधव यांनी उपस्थित केला.
मिठी नदीखाली असलेला खडक तोडला तर पूरस्थिती कमी होईल, असा राज्य सरकारचा अहवाल आहे. मात्र नदीतील खडक आजही जैसे थे असून मिठी नदीतील भ्रष्टाचारावर का बोलत नाही, असा संतप्त सवाल स्थायी समिती सदस्या यामिनी जाधव यांनी केला. दरम्यान, मिठी नदीतील गाळउपसा करण्याचे काम सुरू झाले असून, ऑऊट फाॅल खासगी जागेत असले तरी गाळ काढण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले.

कंत्राटावरून प्रश्‍नचिन्ह
मिठीतील एक लाख मेट्रिक टन गाळ काढायचा असून, अत्याधुनिक मशिनरी नाही. अनुभव नसलेल्‍या कंपनीला काम देण्यात आले आहे. विशेष म्हणजे काळ्या यादीत टाकलेला कंत्राटदार गाळउपशाचे काम करीत आहे. त्यामुळे महिनाभरात गाळउपसा करणे कसे शक्य आहे, असा सवाल काँग्रेसचे गटनेते आश्रफ आजमी यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com