

उल्हासनगरमधून जिया रिचेल अटकेत
नेस्को कॉन्सर्ट प्रकरण
मुंबई, ता. २१ ः नेस्को कॉन्सर्ट प्रकरणात वनराई पोलिसांनी बुधवारी उल्हासनगर येथून जिया रिचेल (वय ३३) या महिलेस अटक केली. एमबीए विद्यार्थ्यांसह कॉन्सर्टमध्ये सहभागी इतर तरुणांना पुरवण्यात आलेल्या एक्स्टेसीचा मुख्य स्रोत जिया आहे, असे तपासाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
या प्रकरणातील ही अकरावी अटक असून अन्य आरोपींसोबत गुरुवारी तिला न्यायालयात हजर केले जाईल, असे सांगण्यात आले. विद्यार्थी असलेल्या आयुष साहित्य, विनीत गेरेलानी, शुभ अगरवाल या अटक आरोपींवर ११ एप्रिलला नेस्को केंद्रात आयोजित कॉन्सर्टमध्ये सुरक्षा रक्षकाला पैसे देऊन अवैधरीत्या, विनातिकीट प्रवेश मिळवला आणि मुक्तपणे एक्स्टॅसीची विक्री केली, असा आरोप आहे. हा साठा त्यांना उल्हासनगर येथे राहणाऱ्या आनंद पटेल या व्यावसायिकाने पुरवला होता. मात्र, एक्स्टॅसी विक्रीतून आलेली रक्कम विविध मार्गांनी जियापर्यंत पोच झाल्याचे उघड होताच पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. या आर्थिक व्यवहारांमुळे एक्स्टॅसी तस्करी, विक्री करणाऱ्या संघटित टोळीत जिया वरच्या फळीतील वितरक असावी, असा संशय पोलिसांना आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.