

कॉन्सर्टना आयत्या वेळी परवानगी नाही
पोलिस आयुक्त देवेन भारती यांची भूमिका
मुंबई, ता. २२ ः आयत्या वेळी कॉन्सर्टसाठी परवानगी दिली जाणार नाही, असे बुधवारी मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी स्पष्ट केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
आयुक्तांनी सांगितले की, आयोजक सात ते आठ महिन्यांपूर्वीच कॉन्सर्टसाठी प्रसिद्ध, लोकप्रिय देशीविदेशी कलावंतांना आरक्षित करतात. ठिकाणही त्याच सुमारास ठरते; मात्र पोलिस किंवा अन्य यंत्रणांची अत्यावश्यक परवानगी तीन ते चार आठवड्यांपूर्वी मागितली जाते. मधल्या काळात कॉन्सर्टना अधिकाधिक गर्दी कशी होईल यासाठी आयोजकांची धडपड सुरू असते. भविष्यात हे खपवून घेतले जाणार नाही. कार्यक्रम स्थळ, कलावंत निश्चित झाल्यावर तातडीने आयोजकांनी परवानगी अर्ज सादर करावेत. परवानगीपूर्वी आयोजकांकडून अटी-शर्तींचे उल्लंघन होणार नाही, यासाठी काय खबरदारी घेणार याची माहिती पोलिसांना कळवतील. त्याआधारे परवानगी दिली जाईल, असे भारती यांनी स्पष्ट केले.
...
समज चुकीचा!
नेस्को प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अन्य खबरदारीचे उपाय योजले आहेत; मात्र चार ते पाच हजार तरुणांपैकी काहींनी अमली पदार्थांचे सेवन केले याचा अर्थ संपूर्ण मुंबई अमली पदार्थांच्या विळख्यात आहे, हा समज चुकीचा आहे. ते वास्तव नाही, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.