एशियाटिकची निवडणूक नियोजित कार्यक्रमानुसारच!

एशियाटिकची निवडणूक 
नियोजित कार्यक्रमानुसारच!
Published on

‘एशियाटिक’ची निवडणूक
नियोजित कार्यक्रमानुसारच!

प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ :  एशियाटिक सोसायटीच्या  निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या दोन्ही याचिका गुरुवारी (ता. २३) उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या. त्यानुसार गतवर्षी ३ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसारच या निवडणुका होणार आहेत. न्यायालयाच्या निर्णयामुळे केतकर गटाला मोठा धक्का बसला आहे.
धर्मादाय आयुक्त अमोग कलोती यांनी १३ मार्चला दिलेल्या आदेशाला काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकरांसह तिघांनी आव्हान दिले होते. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशावरून या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या आणि उपसमित्यांच्या माध्यमातून पात्र मतदारांची नव्याने यादी करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने दोन दिवस प्रदीर्घ सुनावणी घेऊन १६ एप्रिलला निकाल राखून ठेवला होता. नवीन उमेदवारी अर्ज व मतदारांच्या छाननीबाबत एक व्यावहारिक आदेश देण्यात येईल, असेही न्यायालयाने नमूद केले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी न्या. फरहान दुभाष यांच्या एकलपीठाने निकाल जाहीर केला. धर्मादाय आयुक्तांच्या याचिकेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या.
---
निर्णयाला स्थगिती देण्यास नकार
न्यायालयाने निर्णय जाहीर केल्यानंतर त्यास आव्हान देता यावे म्हणून स्थगिती देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली; मात्र निकालपत्रात काही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहेत. त्यांचा विचार करता आम्ही आदेशाला स्थगिती देऊ शकत नाही, असे स्पष्ट करून न्यायालयाने स्थगितीची मागणीही फेटाळली.
----
धर्मदाय आयुक्तांचा निर्णय योग्यच
धर्मादाय आयुक्तांनी अधिकारक्षेत्रात राहूनच कार्यवाही केली आहे, असे न्यायालयाने म्हटले. धर्मादाय आयुक्तांपुढे अनेक सुनावण्या झाल्या. त्या वेळी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून भूमिका मांडण्यात आली. विधिमंडळ अधिवेशनात सोसायटीच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर चौकशी सुरू झाली. धर्मादाय आयुक्तांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकाने अहवालांमध्ये अनियमिततेवर बोट ठेवले होते. मतदारयादीतील तफावत, दोन हजारांहून अधिक पुस्तके गहाळ होण्याचा मुद्दा अधोरेखित केले. २०२५ मध्ये कार्यकाळ संपल्यावरही व्यवस्थापन समितीने कामकाज सुरू ठेवून ३ ऑक्टोबर २०२५ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरही १,४६७ नवीन सदस्यांना प्रवेश दिल्याचेही अहवालात अधोरेखित केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com