

प्रामाणिक सेवा करूनही ‘कायम’ची प्रतीक्षाच
जे. जे. रुग्णालयातील १२२ बदली कामगारांची खंत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबईतील साखळी बाॅम्बस्फोट, नैसर्गिक आपत्ती, इमारत कोसळण्याची दुर्घटना वा कोरोना महामारी, प्रत्येक आपत्तीजनक परिस्थितीवेळी जे. जे. रुग्णालयात बदली कामगार प्रामाणिक सेवा बजावत आले. आताही संपकाळात जवळपास १२२ बदली कामगार आपली जबाबदारी पार पाडत आहेत. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही आम्हाला कायम सेवेत सामावून घेत नसल्याची खंत बदली कामगारांनी व्यक्त केली.
दरम्यान, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले, तरी जे. जे. रुग्णालयातील बदली कामगार संपात सहभागी नाहीत, असे निवेदन जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांना दिल्याचे बदली कामगारांच्या प्रतिनिधींनी सांगितले. १२२ न्यायालयीन बदली कर्मचारी गेली अनेक वर्षे रुग्णालयात प्रमाणिकपणे अत्यावश्यक सेवा बजावत आहोत. या आधीही राज्यव्यापी संप काळात आम्ही रुग्णसेवेवरच भर दिला. आजच्या घडीला राज्य कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे; मात्र रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही बदली कामगार संपात सहभागी झालो नाही. बदली कामगार हे कायमच रुग्णालय व्यवस्थापनाच्या सोबत आहेत. उच्च न्यायालयाचे आदेश असूनही आम्हाला कायम सेवेत सामावून घेण्याकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याची खंत बदली कामगारांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.