आठ महिन्यांत २० हजार गोळ्यांची विक्री

आठ महिन्यांत २० हजार गोळ्यांची विक्री
Published on

२० हजार गोळ्यांची
आठ महिन्यांत विक्री

टिटवाळा एक्स्टॅसी प्रकरण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ ः टिटवाळा येथील अश्विनी पॉलच्या घरातून तब्बल पाच हजार गोळ्या जप्त केल्यानंतर पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली. या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि अश्विनीचा प्रियकर आमिर सय्यदने परदेशातून तब्बल २५ हजार एक्स्टॅसी गोळ्या मागवल्या होत्या आणि मागील सात ते आठ महिन्यांत त्याने त्यातील २० हजार गोळ्यांची मुंबईसह विविध राज्यांत विक्री केल्याचे समोर आले.
आमिर आणि अश्विनीने अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करांच्या संपर्कातून गेल्यावर्षी जून-जुलैमध्ये ही खेप मागवली होती. फेब्रुवारी महिन्यापर्यंत दोघांनी त्यातील २० हजार गोळ्या मुंबई महानगर प्रदेशासह देशातील अन्य राज्यांमध्ये अमली पदार्थांची किरकोळ विक्री करणाऱ्यांना विकल्याचे धक्कादायक माहिती अमली पदार्थविरोधी पथकाच्या तपासातून पुढे आल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी पथकाकडून आमिर आणि अश्विनी यांच्या बँक खात्यांवरील व्यवहार काटेकोरपणे तपासले जात आहेत. विशेषतः त्यांच्या खात्यांवर पैसे पाठविणाऱ्या प्रत्येकाला संभाव्य ग्राहक म्हणून पाहिले जात असून प्रत्येकाकडे चौकशी अपेक्षित आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
----
अनेक विक्रेत्यांचाही तपास
टिटवाळा प्रकरणात अटक झालेल्या इरफान अन्सारीने मुंबई, महाराष्ट्रासह प्रामुख्याने गोव्यात मोठ्या प्रमाणावर एक्स्टॅसी गोळ्यांची विक्री केल्याची माहिती पुढे आली. धक्कादायक बाब म्हणजे आमिर, अश्विनीव्यतिरिक्त त्याने हा साठा आणखी कोणाकडून विकत घेतला होता का, त्या अन्य विक्रेत्यांचीही माहिती पथकाकडून घेतली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com