होमगार्डची ट्रेन मॅनेजरला मारहाण

होमगार्डची ट्रेन मॅनेजरला मारहाण
Published on

होमगार्डची ट्रेन मॅनेजरला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये ड्युटीवर असलेल्या ट्रेन मॅनेजरला होमगार्डने मारहाण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकाराबाबत कर्मचाऱ्यांतून संताप व्यक्त होत असून, संबंधित होमगार्डवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.

विलेपार्ले स्थानक परिसरात ही घटना २१ एप्रिलला रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास घडली. ट्रेन मॅनेजर चैतन्य माळवदे हे कर्तव्‍यावर हाेते. माहीम ते खारदरम्यान काही होमगार्ड महिला डब्यात एकत्र थांबल्या होत्या. या वेळी त्यांना वेगवेगळ्या डब्यांत तैनात राहण्याच्या सूचना दिल्या. या सूचनांकडे या हाेमगार्डनी दुर्लक्ष केले. यावरून वाद हाेऊन संबंधित होमगार्डनी शिवीगाळ केल्याचे माळवदे यांनी सांगितले. त्यांनी तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर मनोज सावंत या होमगार्डने त्यांना लाथ मारल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने ट्रेन मॅनेजर्स अंधेरी जीआरपी पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद (एनसी) केल्याने कर्मचाऱ्यांत नाराजी आहे. कर्तव्य बजावत असताना अधिकाऱ्यावर हल्ला होणे ही गंभीर बाब असून, याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
दरम्यान, जीआरपीने या प्रकरणाबाबत कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. या घटनेमुळे लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com