चौथ्या दिवशीही संपाची धग कायम

चौथ्या दिवशीही
संपाची धग कायम
Published on

चौथ्या दिवशीही
संपाची धग कायम
मुंबई, ता. २३ : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा  संप चौथ्या दिवशीही सुरू होता. या संपात आता उर्वरित परिचारिकाही सहभागी होण्याच्या तयारीत आहेत.
रुग्णालयात आपत्कालीन परिस्थितीतील शस्त्रक्रिया सुरू आहेत. इतर शस्त्रक्रियांसाठी पालिका रुग्णालयांचे संचालक डॉ. शैलेश मोहिते यांच्याशी चर्चा झाली आहे. ओपीडी नियमित सुरू आहे; मात्र शस्त्रक्रियांसाठी मनुष्यबळ अपुरे पडत असल्याचे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी सांगितले. दरम्यान, परिचारिकांच्या संपात सहभागी होण्याबाबत बैठक घेण्यात आली. त्यात नर्सिंगचे विद्यार्थी आणि निवासी डॉक्टर्स रुग्णालय सांभाळतील, असे सांगण्यात आले आहे. २१ एप्रिलपासून सुरू झालेला हा  संप  प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदे तत्काळ भरणे आणि कंत्राटी पद्धतीला आळा घालणे यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com