

टेलीकॉलर तरुणींशी
अश्लील संवाद
आग्रीपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा
मुंबई, ता. २३ : महालक्ष्मी येथील एका नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीत टेलीकॉलर म्हणून काम करणाऱ्या माजी कर्मचारी तरुणींना व्हॉट्सॲप कॉलद्वारे संपर्क साधून अश्लील संवाद साधणाऱ्या तरुणाविरोधात आग्रीपाडा पोलिस ठाण्यात गुरुवारी संशयावरून अशरफ नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका १९ वर्षीय तरुणीने दिलेल्या जबाबानुसार, फेब्रुवारीत ती कंपनीत टेलीकॉलर रुजू झाली. तेथे अन्य तरुण-तरुणी काम करत होते. दोन आठवड्यांत ती साईट बंद झाली. २१ एप्रिलला सकाळी याच कंपनीत टेलीकॉलर म्हणून काम करणाऱ्या अशरफ नावाच्या तरुणाने व्हॉट्सॲप कॉलद्वारे संपर्क साधून अश्लील संवाद साधण्यास सुरुवात केली. त्याने थेट शरीरसुखाची मागणी केल्याने तरुणी घाबरली. तिने स्पष्ट शब्दांत नकार दिला असता अशरफने टेलीकॉलर म्हणून कार्यरत अन्य तरुणींसोबत शरीरसंबंध ठेवल्याचे तिला सांगितले.
तक्रारदार तरुणीने संबंधित तरुणींशी संपर्क साधला असता त्यांनी अशरफ याने व्हॉट्सॲप कॉलद्वारे आपल्याशीही अश्लील संवाद साधल्याचे तिला सांगितले. या तरुणींनी मोबाईल क्रमांक ब्लॉक केला, असे पीडित तरुणीने सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील लैंगिक छळ, विनयभंग आणि ऑनलाइन पाठलागाच्या कलमांनुसार अशरफ नामक व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार तरुणीसोबत कंपनीत कार्यरत असलेल्या अशरफ नावाच्या व्यक्तीनेच हे कृत्य केले आहे का, याची खातरजमा पोलिस करीत आहेत.
दरम्यान, भाजपचे भायखळा येथील पदाधिकारी नितीन बनकर यांनी ही घटना कॉर्पोरेट जिहाद असल्याचा आरोप केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.