सात वर्षात टप्प्याटप्प्याने उभ्‍या राहणार पुनर्वसन इमारती

सात वर्षात टप्प्याटप्प्याने उभ्‍या राहणार पुनर्वसन इमारती
Published on

सात वर्षांत टप्प्याटप्प्याने उभ्‍या राहणार पुनर्वसन इमारती
कामाठीपुरा पुनर्विकास; भाडेकरू, मालकांच्या हक्काला म्हाडाचे प्राधान्य
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडाने विकसकाला स्वीकृती पत्र दिल्याने प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. दरम्यान, निविदेमधील अटीनुसार कार्यादेश दिल्यापासून पुढील सात वर्षांत रहिवासी व जागा मालकाला देय असलेल्या सदनिका टप्प्याटप्प्याने उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे येथील राहिवाशांचे पुनर्विकसित इमारतीमधील सुसज्ज हक्काच्या घराचे स्वप्न पूर्णत्वास जाऊ शकणार आहे.
कामाठीपुरा हा सुमारे ३४ एकर जागेवर वसला असून, तेथे ९४३ जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. त्यामुळे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी भागीरथी हौसिंग प्रा. लिमिटेड आणि माठी डेव्हलपर्स या कंपन्यांना बांधकाम आणि विकास सस्था (सी ॲण्ड डी) म्हणून नियुक्ती करून त्यांना स्वीकृती पत्र नुकतेच दिले आहे. दरम्यान, विकसकांनी स्वीकृती पत्र मिळाल्यापासून ४५ दिवसांत बँक गॅरंटी भरल्यानंतर त्यांच्यासोबत अधिकृतपणे करार करून प्रत्यक्ष काम करण्यासाठी कार्यादेश दिला जाणार आहे. मात्र, विकसकाला कोणत्याही परिस्थितीत पुढील सात वर्षांत भाडेकरू राहिवाशांना देय असलेल्या ५०० चौरस फुटांच्या ८,००१ सदनिका आणि जागा मालकाला देय सदनिका बांधणे बंधनकारक असणार आहे.
दरम्यान, या पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला ४०-४५ हजार चौरस मीटरचे बांधीव क्षेत्रफळ मिळणार आहे. मात्र, त्याचे विक्री घटकासोबत बांधकाम केले जाईल. त्यामुळे सदर पुनर्विकासातून म्हाडाला मिळणाऱ्या सदनिका मिळण्यास सात-दहा वर्षे कालावधी लागणार आहे.

पुनर्वसन क्षेत्रफळाच्या प्रमाणातच विक्री घटकांच्या बांधकामाला परवानगी
विकसकांना कार्यादेश मिळाल्यापासून सात वर्षांत टप्प्यातटप्प्याने पुनर्वसन इमारतीचे काम पूर्ण करावे लागणार आहे. दरम्यान, विकसक जेवढे पुनर्वसन क्षेत्रफळाचे बांधकाम करेल, त्याच प्रमाणात विक्री घटकांच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत विक्री घटकाच्या जादा बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे पुनर्वसन सदनिका वेळेत तयार होऊन रहिवाशांना ताबा मिळू शकेल, अशी तरतूद केली असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com