६६ गुंतवणुकदारांना साडेतीन कोटींचा गंडा

६६ गुंतवणुकदारांना साडेतीन कोटींचा गंडा
Published on

६६ गुंतवणूकदारांना साडेतीन कोटींचा गंडा
मुंबई, ता. २४ ः गुंतवणूक केलेली रक्कम १६ महिन्यांत चौपट होईल, असे प्रलोभन दाखवत ६६ गुंतवणूकदारांना साडेतीन कोटींचा गंडा घालणाऱ्या एस अँड डी वेल्थ ॲडव्हायझर, केजीएन फिनकॉर्प सर्व्हिसेस या कंपन्यांसह आठ जणांविरोधात भांडुप पोलिसांनी गुरुवारी गुन्हा नोंदवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भांडुप येथे राहणाऱ्या सुलतान शेख या ३३ वर्षीय तरुणाने हारून शेख आणि याकूब वारिया या परिचितांच्या प्रलोभनांना बळी पडून सुरुवातीला या कंपन्यांमध्ये ४.२० लाख गुंतवले. काही महिने सव्वा लाखाचा परतावा मिळाल्याने सुलतानने घरातील दागिने विकून, कर्ज काढून आणखी १६.८० लाख रुपये गुंतवले. मात्र पुढील काही महिन्यांत परतावा येणे बंद झाले. सुरुवातीला हारून, याकूबसह कंपनी चालकांनी विविध कारणे देत परतावा देणे टाळले. बरेच महिने गेल्यानंतर सुलतानचा धीर सुटला. तो कंपनी कार्यालयात गेला तेव्हा तेथे टाळे आढळले. हारून, याकूब यांचीही घरे बंद होती. त्यामुळे त्याने भांडुप पोलिस ठाण्यात धाव घेतली. तेथे त्याला या टोळीने अन्य ६५ गुंतवणूकदारांनाही फसवल्याची माहिती मिळाली.
या गुन्ह्यात हारून, याकूब यांच्यासह निलोफर शेख, रकीब शेख, हलिमा शेख, शहानवाझ वरिया, पारस चोक्सी आणि प्रीती चोक्सी यांना आरोपी केले आहे. १० फेब्रुवारी २०२४ ते १० जानेवारी २०२५दरम्यान ही फसवणूक घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com