कोकाकोलाचा समाजहितासाठी उत्तर प्रदेशशी त्रैवार्षिक करार

कोकाकोलाचा समाजहितासाठी उत्तर प्रदेशशी त्रैवार्षिक करार
Published on

कोका-कोलाचा समाजहितासाठी उत्तर प्रदेशशी त्रैवार्षिक करार

मुंबई, ता. २४ : कोका-कोला इंडियाने उत्तर प्रदेशमध्ये सामाजिक कल्याणासाठी तीन वर्षांचा सहकार्य करार केला आहे. यानुसार पिण्याचे पाणी, पर्यावरण जपणूक, उपजीविकेची साधने, कचरा व्यवस्थापन या क्षेत्रांवर भर दिला जाईल.
इन्व्हेस्ट यूपीमार्फत हे सहकार्य होईल. यात पाणीपुरवठ्याच्या सोयीसुविधा उपलब्ध केल्या जातील. तसेच घनकचरा व्यवस्थापन आणि टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर या क्षेत्रांवर लक्ष दिले जाईल. त्याचबरोबर पर्यटनस्थळांवर स्थानिक समुदायांसाठी कौशल्य विकास आणि उपजीविकेची साधने निर्माण करणे या बाबीदेखील केल्या जातील. पर्यावरणपूरक सुविधांचीदेखील निर्मिती केली जाईल.
सामाजिक विकासासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्याने स्वच्छता, पाणीपुरवठा आणि समुदायांना रोजगाराची साधने उपलब्ध करून देणे या क्षेत्रात काम केले जाईल, असे कोका-कोला इंडियाच्या उपाध्यक्ष देवयानी राणा म्हणाल्या. पर्यावरणपूरक उपायोजना, पायाभूत सुविधा निर्मिती तसेच खासगी क्षेत्राच्या अनुभवाचा लाभ घेऊन समाजहितासाठी एकत्रित प्रयत्न केले जातील, असे इन्व्हेस्ट यूपीचे सीईओ विजय आनंद म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com