

मुद्रांक शुल्क विभागाचे काम सुरळीत
- द्वितीय श्रेणी अधिकारी कार्यरत, ऑनलाइनचा परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून संप पुकारला असला तरी त्याचा मुंबई उपनगरातील मुद्रांक शुल्क कार्यालयाच्या कामावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे. वर्ग-२चे अधिकारी आणि जवळपास ५० टक्के इतर कर्मचारी कार्यरत असल्याने अद्याप खरेदी खत, नोंदणी प्रक्रिया सुरळीत सुरू आहे.
मुंबई उपनगरांत मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाची १४ कार्यालये आहेत. त्या प्रत्येक कार्यालयात एक द्वितीय श्रेणी अधिकाऱ्याशिवाय कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक आणि शिपाई असे ८९ कर्मचारी कार्यरत आहेत. दरम्यान, मंगळवारपासून सुरू झालेल्या संपात शिपाई, कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक असे ४८ कर्मचारी सहभागी झाले आहेत. मात्र उर्वरित कर्मचारी हजर आहेत. तसेच नोंदणीची बहुतांश कामे ऑनलाइन होत आहेत. त्यामुळे नागरिकांची कोणतीही गैरसोय होत नसल्याची माहिती उपजिल्हाधिकारी रमेश पगार यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.