‘मजूर सहकारी संस्थांना पालिकेच्या सेवेत घेऊ’

‘मजूर सहकारी संस्थांना पालिकेच्या सेवेत घेऊ’
Published on

‘मजूर सहकारी संस्थांना पालिकेच्या सेवेत घेऊ’

मुंबई, ता. २४ : महापालिका आयुक्तांशी चर्चा करून मुंबईतील सातशे-आठशे मजूर सहकारी संस्थांचा महापालिकेच्या सेवेत समावेश करू, अशी ग्वाही मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आज (ता. २४) येथे दिली.
मुंबई कोकण विभागीय मजूर सहकारी संघाच्या वतीने दादर येथे महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभासद संस्थांचे प्रशिक्षण शिबिर झाले. या शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी तावडे बोलत होत्या. उपमहापौर संजय घाडी, शहाजी पाटील, प्रभाग समितीचे अध्यक्ष व नगरसेवक प्रकाश दरेकर, राज्य कंझ्युमर फेडरेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले, माजी आमदार रमेश कदम, मुंबई कोकण विभागीय मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष व आयोजक सुनील बांबुळकर, दादा इंगळे आदी उपस्थित होते. मजूर सहकारी संस्थांना मुंबई महापालिकेतील कामांमध्ये समाविष्ट करून घेऊन त्यांच्या हाताला मुंबई महापालिकेच्या निधीच्या माध्यमातून कसे काम मिळेल, याचा जोरदार प्रयत्न प्रवीण दरेकर करीत आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार दरेकर म्हणाले, की सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्याला काम देण्याचा निर्णय कालच घेतला आहे. आज महापौर रितू तावडे यांच्याकडून मजूर सहकारी संस्थांना अपेक्षा आहे. मजूर सहकारी संस्थेत काम करणारी मध्यमवर्गीय कुटुंबातील लोक आहेत. त्यांना महापालिकेची कामे मिळाली तर मुंबईच्या स्वच्छतेत आणि विकासातही फार मोठे काम उभे राहील. दरेकर पुढे म्हणाले, की माझ्या कारकिर्दीची सुरुवातच मजूर सहकारी संस्थेतून झाली आहे. त्यामुळे आता पालकत्वाच्या भूमिकेतून मी या चळवळीला जपण्याचे आणि वाढवण्याचे काम करीत आहे. येत्या सोमवारी (ता. २७ ) ‘सहकारी महाराष्ट्र’ या मुखपत्राचे प्रकाशन होईल, असे त्‍यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com