देशभरातील विक्रेत्यांचे तपशील उघड हाेणार?

देशभरातील विक्रेत्यांचे 
तपशील उघड हाेणार?
Published on

एक्स्टॅसीची धुंदी : लाेगाे

देशभरातील विक्रेत्यांचे
तपशील उघड हाेणार?

टिटवाळा प्रकरण : आरोपींच्या खात्यांवर संशयास्पद व्यवहार

मुंबई, ता. २४ : टिटवाळा प्रकरणातील आरोपी आमिर सय्यद आणि अश्विनी पॉल यांच्या खात्यावर अनेक संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासणीतून उघड झाले आहे. या व्‍यवहारांच्या तपशिलातून देशभरातील पार्टी ड्रग्ज विकणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करणाऱ्या व्यक्तीबाबत दाेघांकडे चौकशी सुरू आहे.

आमिर आणि अश्विनीने आठ महिन्यांत २० हजारांहून अधिक एक्स्टॅसी गोळ्या विकल्याचे स्पष्ट झाले आहे. हे व्यवहार मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह गोवा, दिल्ली आणि अन्य राज्यांत झाल्याची माहिती दोघांच्या आर्थिक व्यवहार तपासणीतून उघड झाले आहे. त्या त्या भागातील व्यक्तींनी दोघांच्या बँक खात्यांवर मोठमोठ्या रकमा पाठवल्या आहेत. त्यामुळे या व्यक्ती एक्स्टॅसी गोळ्यांचे खरेदीदार असावेत, असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवहार आणि पैसे पाठविणाऱ्या व्यक्तीबाबत दोघांकडे कसून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, अश्विनीकडून जप्त केलेल्या पाच हजार गोळ्यांचे मूल्य सहा कोटी असल्याचे पथकाने सांगितले होते. त्यानुसार २० हजार गोळ्यांची किंमत २४ कोटी असल्याचा अंदाज असून, त्या व्यवहारांची जुळवाजुळव पोलिस करीत आहेत.

खेमलानीचा शोध सुरू
नेस्को प्रकरणात महेश खेमलानी ऊर्फ मार्क याच्या सांगण्यावरून आरोपींनी एक्स्टॅसी विक्रीची रक्कम मिरा रोड येथे राहणाऱ्या जिया रिचेल या महिलेच्या खात्यावर वळती केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. ही व्यक्ती देशाबाहेर पसार होण्याची शक्यता असून, त्याच्याविरोधात पोलिस लूकआऊट नोटीस जारी करू शकतात. तूर्तास पोलिसांनी त्याच्या भावाला नोटीस जारी करून चौकशीसाठी बोलावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com