पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्रीचा १० तासांचा मेगा ब्लॉक; ५५ लोकल फेऱ्या रद्द, अनेक लोकल गाड्या वळविणार

पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्रीचा १० तासांचा मेगा ब्लॉक; ५५  लोकल फेऱ्या रद्द, अनेक लोकल गाड्या वळविणार
Published on

पश्चिम रेल्वेवर आज १० तासांचा ब्लॉक
- मेट्रो-६ गर्डर बसविणे, दहिसर येथे पादचारी पुलांचे काम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : पश्चिम रेल्वेकडून शनिवारी-रविवारी मध्यरात्री उपनगरी मार्गावर १० तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. जोगेश्वरी-राम मंदिरदरम्यान मेट्रो-६ प्रकल्पासाठी स्टील गर्डर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. यासोबतच दहिसर येथे दोन पादचारी पुलांच्या गर्डर लाँचिंगचे कामही होणार असल्याने या कालावधीत एकूण ५५ लोकल फेऱ्या रद्द असणार आहेत, तर काही मेल-एक्स्प्रेस गाड्या विलंबाने धावणार आहेत.

जोगेश्वरी-राम मंदिरदरम्यान सहाव्या मार्गावर शनिवारी रात्री १०.१५ ते रविवारी सकाळी ८.१५ या कालावधीत ब्लॉक राहणार आहे. तसेच २६ एप्रिलला मध्य रात्री १.४५ ते पहाटे ४.४५ या वेळेत सर्व मार्गांवर ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात सहाव्या मार्गावरील सर्व गाड्या बोरिवली ते अंधेरीदरम्यान अप फास्ट मार्गावर वळविण्यात येतील. दरम्यान, याच कालावधीत दहिसर येथेही दोन पादचारी पुलांसाठी गर्डर बसविण्याचे काम होणार आहे. यासाठी रविवारी पहाटे २.०५ ते ४.०५ या वेळेत डाऊन धीमी, अप धीमी आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल. तसेच २.०५ ते ३.०५ या वेळेत अप जलद मार्गावरही ब्लॉक घेण्यात येणार आहे.

रात्रीच्या लोकलवर परिणाम
ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. शनिवारी चर्चगेटहून रात्री १.०० वाजता सुटणारी शेवटची लोकल रद्द राहील. त्यामुळे विरारकडे जाणारी शेवटची लोकल रात्री १२.५० वाजता सुटेल. रविवारी विरारहून पहाटे ३.४० वाजता सुटणारी पहिली लोकल गोरेगावपर्यंतच धावेल आणि ती धीम्या मार्गावर चालविण्यात येईल. ब्लॉकदरम्यान काही लोकल सेवा रद्द राहणार असून, त्याची सविस्तर माहिती स्थानकांवर उपलब्ध असेल.
---
एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
ब्लॉकमुळे काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. बरौनी-बांद्रा अवध एक्स्प्रेस सूरत-विरारदरम्यान सुमारे दीड तास उशिराने धावेल. भुसावळ-दादर विशेष, अहमदाबाद-बांद्रा लोकशक्ती एक्स्प्रेस आणि एकता नगर-दादर एक्स्प्रेस या गाड्या २० ते ३० मिनिटे उशिराने धावतील. तसेच ओखा-मुंबई सौराष्ट्र मेल ही गाडी सुमारे एक तास १५ मिनिटांनी उशिरा सुटेल, तर भुज-बांद्रा सुपरफास्ट एसी एक्स्प्रेस ४५ मिनिटांनी उशिरा सुटणार आहे. पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com