

शिवशाही घुसखोरांवर कारवाईचा बडगा
मानखुर्दमध्ये ४८ जणांवर कारवाई होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाकडून आता घुसखोरांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. मानखुर्द तुर्भे-मंडाळे येथील शिवशाहीच्या इमारत क्रमांक ३३ मध्ये ४८ जण तीन वर्षांपासून बेकायदा वास्तव्य करीत आहेत. न्यायालयानेही त्यांना बेकायदा ठरवत घुसखोर म्हणून जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांवर आठवडाभरात कारवाई करून सदनिका रिकाम्या केल्या जाणार आहेत.
शिवशाहीने मानखुर्द येथे २०१०मध्ये महात्मा जोतिबा फुले सहकारी संस्थेसाठी घरे उभारली. त्यापैकी काही इमारतींमधील घरांचे वितरण करण्यात आले, तर ३३ क्रमांकाच्या इमारतीतील ४८ सदनिकांचे वितरण न झाल्याने त्या बंद होत्या. दरम्यान, काही जणांनी आपण महात्मा फुले संस्थेला पैसे दिल्याचे सांगत २०२३मध्ये या सदनिकांचा बेकायदा ताबा घेतला. त्यामुळे शिवशाहीने त्यांना घुसखोर ठरवत सदनिका रिकाम्या करण्यास सांगितले होते; मात्र त्यांनी घर रिकामे न केल्याने हे प्रकरण अखेर उपजिल्हाधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे गेले. याबाबत रीतसर सुनावणी झाली आणि संबंधित रहिवाशांनी घरांचा बेकायदा ताबा घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार प्राधिकरणाने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश काढले आणि संबंधितांना नोटीस बजावल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवशाहीने संबंधितांवर ४ मे रोजी पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.
---
पूर्ण तयारीनिशी कारवाई होणार
घरांचा बेकायदा ताबा घेतलेल्या नागरिकांच्या विरोधात उपजिल्हाधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने निर्णय दिल्याने त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी जेसीबी, गॅस कटर, इतर साधनसामग्री आणि निष्कासन कर्मचारी अशी यंत्रणा तयार केल्याची माहिती शिवशाहीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.