विशेष ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल

विशेष ब्लॉकमुळे 
प्रवाशांचे हाल
Published on

विशेष ब्लॉकमुळे
प्रवाशांचे हाल
अनेक लोकल विलंबाने

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या कामासाठी घेण्यात आलेल्या १५ तासांच्या विशेष ब्लॉकचा शनिवारी (ता. २५) प्रवाशांना मोठा फटका बसला. दुपारी १२ ते पहाटे ३ वाजेपर्यंत उंबरमाळी-आटगावदरम्यान ब्लॉक असल्याने आसनगाव-कसारा लोकल सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली.
ब्लॉकदरम्यान बहुतांश गाड्या आसनगाव, टिटवाळा किंवा वासिंद येथेच थांबवल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. अनेकांना बस किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. सीएसएमटीहून सकाळी ९.३४ ते रात्री ९.३२ दरम्यान सुटणाऱ्या गाड्या आसनगावपर्यंतच धावत असल्याने मोठा विलंब झाला. काही गाड्या टिटवाळा येथेच थांबविण्यात आल्या. कसाऱ्याहून येणाऱ्या गाड्याही आसनगाव किंवा टिटवाळा येथूनच सुरू करण्यात आल्या. दरम्यान, कसारा-सीएसएमटी दुपारी २.४२ वाजताची लोकल रद्द करण्यात आल्याने उरलेल्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी झाली. मेल-एक्स्प्रेस गाड्यांवरही परिणाम होऊन काही गाड्या रद्द, तर काही वळविण्यात आल्या असून २५ ते ३० मिनिटांचा विलंब झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com