मुंबई, ठाण्यात उन्हाचा चटका

मुंबई, ठाण्यात उन्हाचा चटका
Published on

मुंबई, ठाण्यात उन्हाचा चटका
मुरबाडमध्ये पारा ४३, ठाण्यात ४१ अंशांपार

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २५ : मुंबईत उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, शनिवारी (ता. २५) मुंबई शहर-उपनगरांसह ठाणे जिल्ह्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. ठाण्यात पारा चाळिशीपार पाेहाेचला असून मुरबाडमध्ये ४३ अंश, तर ठाणे शहरात ४१.७ अंश तापमानाची नाेंद झाली. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) स्वयंचलित हवामान केंद्रांनी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत विक्रोळी ३९.३ अंश सेल्सिअस तापमानासह सर्वात उष्ण ठिकाण ठरले.

मुंबई उपनगरातील अनेक भागांत पारा ३५ अंशांच्या वर गेल्याने मुंबईकर उकाड्याने प्रचंड घामाघूम झाले आहेत. विक्राेळीपाठाेपाठ राम मंदिर परिसरात ३८.५ अंश, वांद्रे येथे ३७.२ अंश आणि विद्याविहारमध्ये ३६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच दहिसरमध्ये ३५.२ अंश आणि चेंबूर (टाटा पॉवर) येथे ३५.० अंश सेल्सिअस इतका पारा राहिल्याने उपनगरात उन्हाचा चटका तीव्रतेने जाणवत आहे.
ठाणे शहरात एप्रिलअखेरीस उष्णतेची तीव्र लाट अधिकच तीव्र झाली असून ठाणे महापालिकेच्या हवामान विभागानुसार शनिवारी तापमानाने ४१.७ अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला. दुपारी सुमारे १ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास नोंदवले गेलेले हे तापमान यंदाचे सर्वाधिक मानले जात आहे.
एप्रिलच्या सुरुवातीला सुमारे ३५ अंशांच्या आसपास असलेले तापमान १० एप्रिलनंतर सातत्याने वाढत आहे. २३ एप्रिलला ४०.९ अंशांवर पोहोचलेले तापमान दोन दिवसांत ४१.७ अंशांपर्यंत पाेहाेचले आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात तापमानाने ४३ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ४३ अंश सेल्सिअसचा पारा चढल्याचे दिसून आले.

​कुलाबा आणि सांताक्रूझची नोंद
​हवामान विभागाच्या मुख्य केंद्रांनुसार, कुलाबा येथे कमाल तापमान ३३.७ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले, तर तेथे आर्द्रतेचे प्रमाण ७६ टक्के इतके राहिले. सांताक्रूझ केंद्रावर तापमानाचा पारा ३५.८ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. येथील आर्द्रता ५८ टक्के इतकी नोंदली गेली.
.......
मुंबईतील तापमान स्थिती (अंश सेल्सिअस)
​विक्रोळी : ३९.३
​राम मंदिर : ३८.५
​वांद्रे : ३७.२
​विद्याविहार : ३६.१
​दहिसर : ३५.२
​चेंबूर : ३५.०
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com