

दुग्धव्यवसायामुळे दरवर्षी
१.२७ कोटी टन मिथेन उत्सर्जन
मुंबई, ता. २५ : दुग्धव्यवसायातून बाहेर पडणारा मिथेन वायू भविष्यात तापमानवाढीचे प्रमुख कारण ठरत आहे. देशात दरवर्षी दुग्धव्यवसायातून सुमारे १.२७ कोटी टन मिथेन उत्सर्जन होते, अशी माहिती व्हॉइस फॉर ॲनिमल्स या संघटनेने मांडले.
वसुंधरा दिनानिमित्त मुंबईत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदान येथे विशेष जनजागृती मोहीम राबविली. या मोहिमेत दुग्धव्यवसायामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम आणि या व्यवसायाचा बीफ उद्योगाशी असलेला संबंध मांडण्यात आला. गायी, म्हशी दूध देणे थांबवतात, तेव्हा त्यांना बीफपुरवठा साखळीत विकले जाते. डेअरी आणि बीफ हे एकाच व्यवस्थेचा भाग आहेत. या दोन्ही उद्योगांमुळे पर्यावरणाशी संबंधित समस्यांबाबत लक्ष वेधले. सरकारी आकडेवारीच्या आधारे पाणीटंचाई, वाढते तापमान आणि पर्यावरणीय हानी यांसारख्या गंभीर विषयांवर या कार्यक्रमात माहिती दिली. ही मोहीम भारतातील २० शहरांमध्ये एकाच वेळी आयोजित करण्यात येत असून मुंबईतील कार्यक्रम त्याचाच एक भाग होता.
मुंबईत युवा कार्यकर्त्यांनी कार्टर रोड, वांद्रे येथे एका सार्वजनिक प्रदर्शनासह रस्त्यावर उतरून डेअरीच्या पर्यावरणीय प्रभावावर आणि बीफ उद्योगाशी असलेल्या त्याच्या दुर्लक्षित संबंधांवर प्रकाश टाकला.
---
डेअरी हे एक निरुपद्रवी उत्पादन असल्याचा समज ही सर्वात मोठी फसवणूक आहे. दुधाचा प्रत्येक पेला हा विनाशाशी केलेला करार आहे.
- आर्यन मिश्रा, प्राणी व हवामान कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.