नाव बदलण्यास केईएम मार्डचा ठाम विरोध

नाव बदलण्यास केईएम मार्डचा ठाम विरोध
Published on

नाव बदलण्यास केईएम मार्डचा ठाम विरोध
डॉक्टरांचा सल्ला न घेता निर्णय; नव्या रुग्णालयाची उभारणी करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला केईएम मार्ड संघटनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. केईएम हे केवळ नाव नसून सार्वजनिक आरोग्यसेवा, वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवेचा ऐतिहासिक वारसा आहे, असे स्पष्ट करत हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
केईएम रुग्णालय देशभरातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळखले जाते. अनेक पिढ्यांतील डॉक्टर, विद्यार्थी, कर्मचारी आणि रुग्णांसाठी या नावाला विशेष भावनिक व व्यावसायिक महत्त्व आहे. अशा संस्थेचे नाव बदलण्यापूर्वी येथे कार्यरत डॉक्टरांचा सल्ला न घेणे अत्यंत निराशाजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
निवासी डॉक्‍टर हे रुग्णालयाचा कणा आहेत. त्यांच्या मताला डावलून घेतलेला कोणताही निर्णय मान्य होऊ शकत नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, नाव बदलण्याऐवजी रुग्णालयासमोरील मूलभूत समस्या सोडवण्यावर भर द्यावा, अशी भूमिका मार्डने मांडली. अपुरी वसतिगृह सुविधा, वारंवार बंद पडणाऱ्या लिफ्ट्स आणि मानधन वितरणातील अनियमितता यांसारख्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

प्रस्‍ताव फेटाळावा
नवीन ओळख निर्माण करायची असल्यास अत्याधुनिक सुविधा असलेले नवे रुग्णालय उभारावे. मात्र, केईएमसारख्या ऐतिहासिक संस्थेची ओळख बदलू नये, असे स्पष्ट करत प्रशासनाने नाव बदलाचा प्रस्ताव फेटाळून लावावा, अशी मागणी केईएम मार्डने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com