दुर्मीळ मेंदूतील रक्तगाठीवर यशस्वी उपचार

दुर्मीळ मेंदूतील रक्तगाठीवर यशस्वी उपचार
Published on

दुर्मिळ मेंदूतील रक्तगाठीवर यशस्वी उपचार
- नऊ वर्षांच्या मुलीला नवे जीवन; शताब्‍दी रुग्‍णालयात शस्‍त्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : मुंबई महापालिकेच्या कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका रुग्णालयात (शताब्दी रुग्णालय) डॉक्टरांनी नऊ वर्षांच्या मुलीवरील अत्यंत गुंतागुंतीच्या आणि दुर्मिळ आजारावर यशस्वी उपचार करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
काही दिवसांपासून तीव्र डोकेदुखी, ताप आणि उलट्या यांसारख्या तक्रारींसह तसेच शुद्धीवर परिणाम झालेल्या अवस्थेत या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीत मेंदूमधील दाब वाढल्याचे तसेच संसर्गाचे निदान झाले असून, प्रोटीन वाढलेले, ग्लुकोज कमी आणि पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले आहे. पुढील एमआरआय आणि वेनोग्राफी तपासणीत मेंदूतील शिरांमध्ये रक्ताची गाठ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर डॉक्टरांनी तत्काळ योग्य औषधोपचार सुरू केले असून, क्षयरोगाची शक्यता नाकारण्यात आली आहे.
पुढील तपासणीत तिच्या डोळ्यांमध्ये आयरिस कोलोबोमा आढळले असून, ईएनटी तपासणीत कोलेस्टेटोमा हा गंभीर आजार असल्याचे समोर आले आहे. उच्च क्षमतेच्या सीटी स्कॅनमध्ये कानाच्या हाडांना झालेली इजा, चेहऱ्याच्या नसवाहिनीवरील परिणाम आणि मॅस्टॉइडायटिसची पुष्टी झाली असून, जुगुलर शिरेतही थ्रोम्बोसिस आढळला.
प्रकृती स्थिर झाल्यानंतर रुग्णालयात कोलेस्टेटोमा शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. शस्त्रक्रियेनंतर मुलीला रक्त पातळ करणारे औषधोपचार देण्यात आले असून, तिच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. अखेर डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मुलीला पूर्णपणे स्थिर अवस्थेत घरी सोडण्यात आले.

वेळेवर उपचाराने दिलासा
उपचारादरम्यान मुलीची प्रकृती एकदा अत्यंत गंभीर झाली होती आणि तिला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. मात्र, वेळेवर उपचार मिळाल्यामुळे तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com