मुंबई-पुणे प्रवासाला ताशी १२० किमीचा वेग

मुंबई-पुणे प्रवासाला ताशी १२० किमीचा वेग
Published on

मुंबई-पुणे प्रवासाला ताशी १२० किमीचा वेग

मिसिंग लिंकचे १ मे राेजी उद्‍घाटन; १३ किमीचा बोगदा, केबल-स्टेड ब्रिज पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी आणि खंडाळा घाटातील रखडपट्टीच्या प्रवासाला मिसिंग लिंकमुळे वेग येणार आहे. महाराष्‍ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तब्बल साडेसहा हजार कोटी रुपये खर्चून १३.५ किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक उभारला असून, साडेसहा किमीच्या द्रुतगती मार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण केले आहे. दोन बोगदे आणि खोल दरीवरील केबल-स्टेड ब्रिज असलेल्या या मिसिंग लिंकचे १ मे महाराष्ट्रदिनी उद्‍घाटन केले जाणार आहे. या मार्गावर ताशी १००-१२० किमी वेगाने वाहने चालवणे शक्य होणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर घाट सेक्शनमध्ये हाेणारी काेंडी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने २०१८मध्ये खोपोली ते कुसगावदरम्यान मिसिंग लिंक आणि साडेसहा किलोमीटर लांबीच्या द्रुतगती मार्गाचे चार पदरीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मिसिंग लिंकवरील १.६४ किमी आणि ८.९२ किमीच्या लांबीच्या आणि २३.५० मीटर रुंदीच्या देशातील सर्वात मोठ्या दोन बोगद्यांचे आणि दरीवर ९०० मीटर लांब आणि १८० मीटर उंचीच्या केबल-स्टेड ब्रिजचे काम पूर्ण केले आहे.
---
दोन पॅकेजमध्ये काम सुरू
खोपोली ते कुसगाव हे १९ किलोमीटरचे अंतर असून, मिसिंग लिंकमुळे लोणावळा बायपास होणार आहे. या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत केले आहे. पहिल्या पॅकेजमध्ये ८.९२ किमी आणि १.६४ किमी लांबीच्या बोगद्याचे काम नवयुग कन्स्ट्रक्शन कंपनीने केले आहे, तर दुसऱ्या पॅकेजमध्ये साडेसहा किलोमीटरचे रुंदीकरण आणि ९०० मीटर आणि ६५० मीटरचे दोन वायडकटचे काम करण्यात आले आहे.
----
२८ मीटर खोल पाया
साडेसहाशे मीटर लांबीचा वायडक्ट असलेल्या दरीत ताशी १८० किलोमीटर वेगाने वारा वाहतो. त्यामुळे १८४ मीटर उंचीचा आणि २६ मीटर रुंदी असलेला हा केबल-स्टेड ब्रिज उभारला असून, त्याचा पाया तब्बल २८ मीटर खोलीपर्यंत आहे.
----
पाच रिश्‍टर स्केलचा भूकंप पचवणार
लोणावळा भूकंपाच्या दृष्टीने फारसा संवेदनशील नसला तरी केबल-स्टेड ब्रिजची उंची पाहता अफकॉनने सुरक्षेची विशेष खबरदारी घेतली आहे. त्यानुसार पाच रिश्टर स्केलचा भूकंप पचवू शकेल, अशी या केबल-स्टेड ब्रिजची रचना केली आहे. पायलॉन म्हणजे उभ्या पिलरमध्ये ३२ एमएमचे लोखंडी रोड वापरले आहेत. वायडकटसाठी ३.५ लाख क्युबिक मीटर सिमेंट काँक्रीट, ३१ हजार टन लोखंडाचा वापर केला आहे.
----
मिसिंग लिंकची गरज का?
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग-४ खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र येतात, तर खंडाळा एक्झिटजवळ वेगवेगळे होतात. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या सहा मार्गिका आणि महामार्ग ४ वरील चार मार्गिकांची वाहतूक एकत्र येत असल्याने घाट परिसरात या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होते. त्यावर उपाय म्हणून एमएसआरडीसीकडून मिसिंग लिंकचा पर्याय पुढे आणला आहे.
----
- प्रकल्पाचा खर्च - ६,६९५.३७ कोटी
- जमीन : १२८.३७ हेक्टर

कामाला सुरुवात
- पॅकेज १ - २१ फेब्रुवारी २०१९ (नवयुग कन्स्ट्रक्शन)
- पॅकेज २ - १ मार्च २०१९ (एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर)

अंतर कमी होणार
- खोपोली एक्झिट ते कुसगाव मूळ अंतर सहा किमीने कमी होणार
- बोरघाटातील तीव्र वळणे आणि चढ-उतार टाळता येणार
- २५-३० मिनिटांनी प्रवासाचा वेळ वाचणार
----------
एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी
मुंबई-पुणेदरम्यान उभारलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, हा मार्ग महाराष्ट्रदिनी खुला केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com