महापालिकेच्या पशुवैद्यक अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

महापालिकेच्या पशुवैद्यक 
अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
Published on

महापालिकेच्या पशुवैद्यक अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
मुंबई, ता. २६ ः भरधाव ट्रकच्या धडकेत महापालिकेचे पशुवैद्यक अधिकारी निवास यादव (३१) यांचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्यावर यादव यांच्या घरानजीकच घडला. याप्रकरणी विक्रोळीच्या पार्क साईट पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, यादव हे पालिकेच्या देवनार पशुवधगृहात कार्यरत होते. ते पवईच्या आयआयटी परिसरात कुटुंबासह वास्तव्यास होते. ते शुक्रवारी दुपारी आपल्या दुचाकीने कामावर जाण्यासाठी निघाले. ते गांधीनगर चौकाजवळ असताना त्यांच्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या यादव यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com