‘मेट्रो-६’चे काम प्रगतीपथावर

‘मेट्रो-६’चे काम प्रगतीपथावर
Published on

‘मेट्रो-६’चे काम प्रगतिपथावर
पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्पॅनची उभारणी
मुंबई, ता. २६ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो-६ मार्गिकेवर आज महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी टप्पा पूर्ण केला आहे. सुमारे १४.५ किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेवर पश्चिम रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी तब्बल ४२ मीटर लांब आणि १६८.९६ टनाच्या स्टील स्पॅनची यशस्वी उभारणी केली आहे.
एमएमआरडीएकडून अंधेरी पश्चिमेकडील स्वामी समर्थनगर ते विक्रोळीदरम्यान मेट्रो मार्गिका उभारली जात आहे. त्यानुसार जोगेश्वरी परिसरात पश्चिम रेल्वेच्या कार्यरत मार्गावर स्टील डेक उभारणे मोठे आव्हानात्मक होते. १० तासांच्या नियोजित रेल्वेच्या ब्लॉक कालावधीत ४२ मीटर स्टील कॉम्पोझिट गर्डर स्पॅनची उभारणी केली. या कामासाठी ५०० टन आणि ६०० टन क्षमतेच्या हायड्रॉलिक क्रेन्सचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे अत्यंत मर्यादित जागा असल्याने दोन्ही क्रेन्स रेल्वे ट्रॅकदरम्यान उभ्या करण्यात आल्या होत्या.
---
स्पॅनची वैशिष्ट्ये
लांबी : ४२ मीटर
वजन : सुमारे १६८.९६ मेट्रिक टन
रचना : मुख्य गर्डर्स, क्रॉस गर्डर्स आणि ब्रेसिंगसह कम्पोझिट स्टील प्रणाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com