प्रवाशांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र यंत्रणा

प्रवाशांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र यंत्रणा
Published on

प्रवाशांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र यंत्रणा
‘आपली बस, आपली सेवा’ १ मेपासून एसटीचे अभियान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता . २६ : एसटी महामंडळाकडून ‘आपली बस, आपली सेवा’ अभियान राबविले जाणार आहे. याद्वारे प्रवासीसेवेला नवी दिशा देण्याचा संकल्प केला आहे. प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेसह अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. या उपक्रमाची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यानुसार एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी परिपत्रक जारी केले.

सरनाईक म्हणाले की, एसटी बसची संख्या वाढत असली तरी प्रवासीसंख्या आणि महसूल अपेक्षेप्रमाणे वाढत नाही. यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या अभियानात चालक आणि वाहक हे केवळ कर्मचारी न राहता ‘सेवक’ बनणार आहेत. बस सुटण्यापूर्वी चालकाने स्वतःची ओळख करून देऊन प्रवाशांना प्रवासाचा मार्ग, थांबे आणि अपेक्षित वेळ याची माहिती देणे अशा प्रकारे चालक-वाहक प्रवाशांना मदतीचा हात देणार आहेत. या अभियानात प्रवाशांनाही समान सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे. बस रद्द होणे किंवा मार्गात अडथळे निर्माण होणे या अनपेक्षित परिस्थितीत प्रवाशांना तत्काळ पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
==
तक्रारींवर तत्पर उपाय
प्रवाशांच्या तक्रारींना केवळ नोंद न मानता त्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे. प्रत्येक स्तरावर नियमित आढावा घेऊन सेवेतील उणिवा दूर करण्यावर भर दिला जाणार आहे.
==
‘आपली बस, आपली सेवा’ हा मंत्र प्रत्यक्षात उतरला, तर प्रत्येक प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग न राहता सुखद, सन्मानपूर्वक आणि समाधानकारक अनुभव ठरेल.
-प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com