महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेसाठी राज्यभरात शांततेत मतदान

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेसाठी
राज्यभरात शांततेत मतदान
Published on

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेसाठी
राज्यभरात शांततेत मतदान
डॉक्टरांचा मर्यादित प्रतिसाद; बुधवारी निकाल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेसाठी रविवारी (ता. २६) राज्यभरात शांततेत मतदान पार पडले. नऊ जागांसाठी सुमारे ६० उमेदवार रिंगणात असल्याने या निवडणुकीकडे वैद्यकीय क्षेत्राचे विशेष लक्ष लागले होते. मुंबईत ५८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मतदान पार पडले. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात सकाळपासूनच मतदारांची लक्षणीय उपस्थिती होती. मतदान केंद्रांवर निवडणूक अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, राज्यभरातील चित्र पाहता डॉक्टरांकडून तुलनेने कमी प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते. सुमारे एक लाख ४० हजार नोंदणीकृत मतदार असतानाही केवळ १५ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कोल्हापूरमध्ये ४३९, हिंगोली १३५, सोलापूर ७०९, वर्धा १८२, सांगली ३६९ तर यवतमाळमध्ये २१२ मतदारांनी मतदान केले.
या निवडणुकीत प्रथमच इंडियन मेडिकल असोसिएशन संलग्न तीन पॅनेल्ससह विविध गट मैदानात उतरले आहेत. याशिवाय इतर पॅनेल्स आणि काही अपक्ष उमेदवारांनीही निवडणूक लढवली आहे. काही पॅनेल्सना राजकीय पाठबळ असल्याच्या चर्चेमुळे तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अंतर्गत मतभेद उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अधिक चुरशीची ठरली. बुधवारी परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूट येथे मतमोजणी पार पडणार असून, त्यानंतर अधिकृत निकाल जाहीर केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com