दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करा अन्यथा आंदोलन

दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करा अन्यथा आंदोलन
Published on

दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करा अन्यथा आंदोलन
खासदार अरविंद सावंत यांचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : कोरोनापूर्व काळातील दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा दादर स्थानकावरूनच सुरू करावी, या मागणीसाठी आता आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. ही ट्रेन सध्या दिवा स्थानकावरून चालवली जात असल्याने कोकणवासी आणि मुंबईतील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी आयोजित ‘महाराष्ट्र रेल्वे परिषदे’त खासदार अरविंद सावंत यांनी मे महिन्यात तीव्र रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
‘महाराष्ट्र रेल्वे परिषद-एक वज्रमूठ, एक आवाज...’ या टॅगखाली झालेल्या या परिषदेत प्रवासी संघटनांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. दादर-रत्नागिरी पॅसेंजरचे दिवा स्थानकावर स्थानांतरण करणे हा कोकणी माणसाच्या हक्कावर गदा आणणारा निर्णय असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी, ही ट्रेन दादरवरून सुरू न होणे हे महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी कमी करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप केला.
रेल्वे बोर्डाच्या या धोरणामुळे स्थानिक व्यापारावर आणि प्रवाशांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याचा मुद्दाही या वेळी मांडण्यात आला. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक शिष्टमंडळ लवकरच रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार आहे. जर या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले, तर संघटितपणे रेल रोको आंदोलन छेडले जाईल, असे खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या मागणीच्या अनुषंगाने कार्यकारी व्यवहार्यता तपासण्याचे आदेश दिल्याचेही समोर आले आहे, ज्यामुळे प्रवाशांच्या या प्रलंबित मागणीला काही प्रमाणात वाव मिळाल्याचे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com