राज्यात उष्णतेची लाट

राज्यात उष्णतेची लाट
Published on

मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा
संरक्षणासाठी पालिकेकडून मार्गदर्शक सूचना

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : संपूर्ण महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला असून, हवामान खात्याकडून पुढील चार दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही पुढील चार दिवस मंगळवार (ता. २८) ते शुक्रवारपर्यंत (ता. १) ३५ अंश सेल्सिअसवर तापमान राहणार असल्याने महापालिकेने राज्य सरकारच्या निर्देशानुसार उष्णतेपासून बचावासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत.
मुंबई महापालिका प्रशासनाने उष्णतेपासून बचावासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. सकाळी किंवा दुपारी थेट सूर्यप्रकाश येणाऱ्या खिडक्यांवर पडदे किंवा शेड्स लावावेत, असेही सांगण्यात आले आहे. स्थानिक हवामानाचा अंदाज नियमितपणे ऐकून तापमानातील बदलांची माहिती ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वातानुकूलन सुविधा नसल्यास घराच्या खालच्या मजल्यावर सूर्यप्रकाशापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
नागरिकांना आवाहन
अपस्मार, हृदय, मूत्रपिंड किंवा यकृत विकार असलेल्या व्यक्तींनी तसेच द्रव मर्यादित आहारावर असलेल्यांनी द्रवपदार्थ वाढवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उन्हात बाहेर पडताना टोपी किंवा कपड्याने चेहरा आणि डोके झाकण्याचा सल्लाही महापालिकेकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी या सूचनांचे पालन करून उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com