पालिकेचे क्रीडाभवन वादाच्या भोवऱ्यात

पालिकेचे क्रीडाभवन वादाच्या भोवऱ्यात
Published on

पालिकेचे क्रीडा भवन वादाच्या भोवऱ्यात
टाऊन हॉल बांधण्यास कर्मचारी, अधिकाऱ्यांचा विरोध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः मुंबई महापालिकेचे क्रीडा भवन सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. त्याचे भवितव्य अजून निश्चित झालेले नाही. या क्रीडा भवनची वास्तू पाडून तिथे टाऊन हॉल बांधण्यास पालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे क्रीडा भवन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
क्रीडा भवनची स्थापना १९२६मध्ये झाली. हे शताब्दी पूर्ण केलेले ऐतिहासिक क्रीडा केंद्र आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने या जागेवर नवीन टाऊन हॉल किंवा महापालिका सभागृह बांधण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यासाठी जुने क्रीडा भवन पाडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालिका कर्मचारी, खेळाडू आणि काही लोकप्रतिनिधी या निर्णयाला तीव्र विरोध करीत आहेत.
सर्वपक्षीय स्तरावरही या विषयावर मतभेद असून प्रस्ताव पुनर्विचारासाठी परत प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. कामगारांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची नुकतीच भेट घेतली आणि या क्रीडा भवनची वास्तू जतन करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे भवनचा विषय चिघळण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या क्रीडा भवनच्या या वास्तूबाबत अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे प्रकल्प अनिश्चित अवस्थेत आहे. क्रीडा केंद्र सध्या कार्यरत स्वरूपात विकसित होत नाही; उलट ते पुनर्विकास आणि संभाव्य पाडकामाच्या टप्प्यावर आहे, त्याबाबत मोठा राजकीय वाद सुरू आहे.

काय आहेत मागण्या?
- क्रीडा भवनचा वारसा जपावा.
- पुनर्विकास झाला तरी क्रीडा सुविधा कायम ठेवाव्यात.
- पूर्ण पाडून नवीन सभागृह, टाऊन हॉल, सभागृह बांधावे.
- क्रीडा सुविधा पुरवाव्यात.
- क्रीडा भवन आहे तसे जतन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com