

अग्निशमन एनओसीत सुसूत्रता आणणार!
शैक्षणिक संस्थांबाबत देसाई यांचे निर्देश
मुंबई, ता. २७ : शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक (कमर्शियल) आस्थापनांचे स्पष्ट वर्गीकरण केल्यानंतर आवश्यक ते परिपत्रक तातडीने जारी करावे तसेच शाळा, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक आस्थापनांसाठी अग्निशमन विभागाच्या एनओसीचे दर वेगवेगळे निश्चित करण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.
राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांना अग्निशमन विभागाकडून दरवर्षी एनओसी घेण्यासाठी करावा लागणारा खर्च तसेच त्यासंदर्भातील अडचणींचा सविस्तर आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. या बैठकीस आमदार धीरज लिंगाडे, आमदार अभिजित वंजारी, महाराष्ट्र अग्निशमन सेवेचे सहसंचालक किरण हत्यायन, नगर विकास विभागाचे अवर सचिव अशोक लकस तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र विधान परिषद नियम १०१ अन्वये विधान परिषद लक्षवेधी क्र. ४१६अंतर्गत मांडण्यात आलेल्या विषयाच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली. राज्यातील शैक्षणिक संस्थांना दरवर्षी अग्निशमन विभागाकडून एनओसी घेण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागत असल्याची बाब विचाराधीन घेण्यात आली. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित महापालिका तसेच मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.