उपचारांदरम्यान ट्रॉलीवरून पडून महिलेचा मृत्यू

उपचारांदरम्यान ट्रॉलीवरून
पडून महिलेचा मृत्यू
Published on

उपचारांदरम्यान ट्रॉलीवरून
पडून महिलेचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : कूपर रुग्णालयात उपचारांदरम्यान २५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी एसआयसीयूमध्ये (स्पेशल इंटेन्सिव्ह केअर युनिट) बेड न मिळाल्याने रुग्णाला ट्रॉलीवर ठेवण्यात आले हाेते. त्यावरून रुग्ण पडल्याने प्रकृती अधिक खालावली, असा गंभीर आरोप मृत महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली असून, मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम अहवालानंतर स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले.

गोरेगाव येथील संध्या यादव यांना पोटदुखीमुळे शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. माझी बहीण पाण्यासाठी हाक मारत होती; मात्र आम्हाला आत जाऊ दिले जात नव्‍हते. याचदरम्यान ती ट्रॉलीवरून खाली पडून तिची प्रकृती बिघडल्याचा आराेप मृत महिलेचे भाऊ प्रदीप यादव यांनी केला. रविवारी सकाळी सुमारे ७च्या सुमारास डॉक्टरांनी संध्या यादव यांना मृत घोषित केले.
दरम्यान, उपचारांदरम्यान नाकावाटे पाइप घालण्याचा प्रयत्न करताना रक्तस्राव झाल्याचाही आरोप नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणाचे गंभीर्य लक्षात घेऊन चाैकशी करण्यात यईल, असे प्रमुख पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com