मुंबईत पुन्हा अतिक्रमणे वाढून देऊ नका

मुंबईत पुन्हा अतिक्रमणे वाढून देऊ नका
Published on

मुंबईत पुन्हा अतिक्रमणे वाढून देऊ नका
पालकमंत्री आशीष शेलार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : ‘सर्व पुनर्वसन प्रकल्प पूर्ण झाल्यावर एक लाख ७५ हजार पात्र झोपडपट्टीधारकांना घर मिळणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील अडथळे दूर करत यापुढे अतिक्रमण होऊ नये याची खबरदारी घ्यावी,’ असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी प्रशासनाला दिले आहेत.

ॲड. आशीष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. २७) उपनगर जिल्ह्यातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण आणि या जमिनींवरील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांची आढावा बैठक झाली. २०१६ च्या सर्वेक्षणानुसार, मुंबई उपनगर जिल्ह्यातील सुमारे ४,१९४ एकर शासकीय जमिनीवर अतिक्रमण आहे. या जमिनी राज्य सरकार, मुंबई महापालिका, म्हाडा आणि केंद्र सरकारच्या मालकीच्या आहेत. शासकीय जमिनीवर असलेल्या या अतिक्रमणांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा आढावा या वेळी घेण्यात आला. सद्यःस्थितीत ८७.७९ लाख चौरस मीटरवर ९२६ पुनर्वसन प्रकल्प आहेत. यापैकी १६० प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. ३२२ प्रकल्प सुरू असून, ११४ स्थगित आहेत, तर ३३० प्रकल्पांची मंजुरी प्राप्त झाली आहे. या सर्व प्रकल्पांमधून सुमारे पात्र एक लाख ७५ हजार ५११ झोपडपट्टीधारकांना घर मिळणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

प्रकल्पाचा आढावा
बैठकीत सर्व प्रकल्पांची सद्यःस्थिती, अडचणी यांचा आढावा घेण्यात आला. सुरू असलेले प्रकल्प तातडीने पूर्ण करावे, स्थगित प्रकल्पांबाबत आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरे उपलब्ध करून द्यावी. यापुढे अतिक्रमण रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना ॲड. शेलार यांनी दिल्या.
..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com