

तृतीय वर्ष बीकॉमचा निकाल जाहीर
मुंबई, ता. २८ : मुंबई विद्यापीठाच्या प्रथम सत्र उन्हाळी २०२६ मार्चमध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष बीकॉम सत्र ५ परीक्षेचा निकाल लागला आहे. अवघ्या १६ दिवसांत हा निकाल विद्यापीठाने जाहीर केला आहे. या परीक्षेसाठी एकूण २५,९२० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २३,९६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ९,८११ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी ४०.९७ एवढी आहे. या परीक्षेचा निकाल https://www.mumresults.in/ या संकेतस्थळावर आहे. परीक्षा संपल्यापासून ते जलदगतीने मूल्यांकन करून सहकार्य केल्याबद्दल या प्रक्रियेत सहभागी सर्व घटकांचे संचालकांनी आभार मानले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.