

काँग्रेसशी युतीमुळेच ‘केईएम’च्या नामांतरला विरोध : लोढा
मुंबई, ता. २८ : सोनिया गांधी यांच्या काँग्रेससोबत गेल्यामुळेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना, कौशल्यश्रेष्ठ एकलव्याच्या नावाला विरोध करीत असल्याचा जोरदार हल्ला मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर चढवला.
किंग एडवर्डसारख्या ब्रिटिशांनी व त्यांच्या हस्तकांनी आपल्या भारतीय शेतकऱ्यांसह अनेकांना मारले. त्यांच्या नावाची भक्ती तुम्ही करीत आहात, याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशी टीका लोढा यांनी केली. लोढा यांनी काही दिवसांपूर्वीच केईएम रुग्णालयाच्या नामांतराबाबतचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीला दिला होता. समितीने तो मंजूर केला आहे; मात्र त्या प्रस्तावास ठाकरे शिवसेनेने विरोध केला आहे. कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल अशा नामांतरानंतरही रुग्णालयाचे इंग्रजी नाव केईएम असेच राहील, असेदेखील लोढा यांनी सांगितले. यापूर्वी व्हीजेटीआय, व्हीटी ही नावे बदलताना ठाकरे आमच्याबरोबर होते. आता सोनिया गांधी यांना एडवर्ड नाव हवे असल्याने ठाकरे टीका करीत आहेत, असे लोढा म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.