शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्टी

शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्टी
Published on

शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्टी

मुंबई, ता. २८ : राज्य मंडळाच्या अखत्यारीतील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा शैक्षणिक वर्ष २०२५-२६चा निकाल १ मे रोजी जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर २ मेपासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे. शालेय शिक्षण विभागाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक नियोजन आखण्यात आले असून, त्यानुसार उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात २ मेपासून होईल. तसेच पुढील शैक्षणिक वर्षासाठी शाळा १५ जूनच्या सुमारास सुरू होण्याची शक्यता आहे.
पहिली ते नववी इयत्तेतील विद्यार्थ्यांचे निकाल १ मे रोजी जाहीर करण्यात येणार असून, त्याच दिवशी त्यांना गुणपत्रिकांचे वाटप केले जाईल. यासोबतच शाळा व व्यवस्थापनांसाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिका पालकांना दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com