एका रात्रीत तीन भव्य गर्डरची उभारणी

एका रात्रीत तीन भव्य गर्डरची उभारणी
Published on

एका रात्रीत तीन भव्य गर्डरची उभारणी
पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक ठरला यशस्वी; नियोजित वेळेआधीच काम पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : पश्चिम रेल्वे मार्गावरील मेट्रो-६ प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या तीन भव्य गर्डरची उभारणी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. जोगेश्वरी ते राम मंदिर स्थानकांदरम्यान घेण्यात आलेल्या विशेष रात्रकालीन मेगाब्लॉकदरम्यान हे काम पार पडले. विशेष म्हणजे नियोजित वेळेच्या सुमारे ३० मिनिटे आधीच ही उभारणी पूर्ण करण्यात आली.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ आणि ३ मेच्या मध्यरात्री ३२ मीटर लांबीचे आणि सुमारे ११० टन वजनाचे प्रत्येकी तीन गर्डर यशस्वीपणे बसविण्यात आले. या कामासाठी सहावी व शंटिंग लाइनवर सुमारे १० तासांचा ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला होता. तसेच अप फास्ट आणि पाचव्या लाइनवर अनुक्रमे तीन व पाच तासांचे ब्लॉक घेण्यात आले.
या संपूर्ण कामात सुमारे ११० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. काम सुरक्षित आणि अचूक पार पडावे यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. यात ६०० टन क्षमतेची एक क्रेन, ५०० टन क्षमतेच्या दोन क्रेन तसेच तितक्याच क्षमतेच्या दोन अतिरिक्त (स्टँडबाय) क्रेन तैनात करण्यात आले होते. याशिवाय दोन हायड्रा, दोन जेसीबी, एक मटेरियल लिफ्टर आणि दोन टॉवर वॅगन यांचाही वापर करण्यात आला. या कामामुळे मेट्रो-६ प्रकल्पाच्या उभारणीला गती मिळणार असून, भविष्यातील वाहतूक सुलभतेसाठी हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com