

पश्चिम द्रुतगती मार्गावरील नाल्याची सफाई
पालिका करणार १२ कोटी ७९ लाख रुपये खर्च
सकाळ वृत्तसेवा
मुंब, ता. ४ : पावसाळा तोंडावर आला असताना गैरसोय होऊ नये, यासाठी नालेसफाईच्या कामाला वेग आला असून अंधेरी आणि वांद्रे विभागातील तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरील छोटे नाले, पेटिका नाल्यांच्या सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल १२ कोटी ७९ लाख ५४ हजार रुपये खर्च करणार आहे. येत्या बुधवारी (ता. ६) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असून, यावर वादळी खडाजंगी चर्चा होण्याची शक्यता आहे.
अंधेरी विभागातील आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील छोटे नाले, पेटिका नाले तसेच रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्या आणि पातमुखे वाहून येणारी माती, घाण, कचरा इत्यादींमुळे गाळाने भरतात. पर्जन्य जलवाहिन्यांच्या नाल्यांचा काही भाग भरती-ओहोटीमुळे बाधित होणाऱ्या भागात येतो. त्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित न होता गाळ साचून राहतो. तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी आणि त्यानंतर नाल्यातील प्रवाह सुरळीत ठेवण्याकरिता गरज असेल तेव्हा त्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या नाल्यांतील गाळ काढण्यासाठी कंत्राट देण्यात आले आहे. यासाठी मुंबई महापालिका नऊ कोटी ७० लाख ५१ हजार २४० रुपये खर्च करणार आहे.
यासाठी मुंबई महापालिका तीन कोटी नऊ लाख तीन हजार १५८ रुपये खर्च करणार आहे. एकूणच के पूर्व, एच पश्चिम आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील नालेसफाईसाठी १२ कोटी ७९ लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत.
पाण्याचा निचरा होण्यास अडथळे
वांद्रे विभागातील व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील छोटे नाले, पेटिका नाले तसेच रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्या आणि पातमुखे वाहून येणारी माती, घाण, कचरा इत्यादींमुळे गाळाने भरतात. पर्जन्य जलवाहिन्यांच्या नाल्यांचा काही भाग भरती-ओहोटीमुळे बाधित होणाऱ्या भागात येतो. त्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित न होता गाळ साचून राहतो. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी आणि त्यानंतर नाल्यातील प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.