

मिठीच्या गाळ उपशात अनियमितता
काँग्रेस नेते अशरफ आझमी यांचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : पावसाळा तोंडावर आलेला असताना मिठी नदीच्या साफसफाईत मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी केला आहे. महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे यंदाही पावसाळ्यात मुंबईकरांना पुराचा फटका बसण्याची भीती त्यांनी सभागृहात व्यक्त केली.
गेल्या वर्षी विशेष यंत्रसामग्रीसह काम करणाऱ्या कंत्राटदारांना १,६०९ रुपये प्रति मेट्रिक टन दर दिला जात होता; मात्र यंदा अनुभव नसलेल्या कंत्राटदारांना कोणतीही अत्याधुनिक यंत्रणा नसताना १,७५० रुपये प्रति मेट्रिक टन असा वाढीव दर का देण्यात आला? विशेष यंत्रणा नसल्याने दरात मिळणारी सवलत पालिकेने का वसूल केली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
दरवर्षी महापालिका गाळ उपशाची माहिती आणि थेट प्रक्षेपणाची लिंक आपल्या पोर्टलवर उपलब्ध करून देते; मात्र यंदा अशी कोणतीही व्यवस्था नाही. भ्रष्टाचार लपवण्यासाठीच जाणीवपूर्वक पारदर्शकता टाळली जात आहे. मिठी नदीचे ड्रोन सर्वेक्षण आणि डम्पिंग प्लॉटचे लाइव्ह फुटेज जनतेसाठी खुले करावे, अशी मागणी आझमी यांनी केली आहे.
-----
अनेक भागांत कामाचा पत्ता नाही!
मिठी नदीच्या नऊ किमीच्या पट्ट्यात अत्यंत कमी यंत्रसामग्री तैनात आहे. अनेक भागांत अद्याप कामाला सुरुवातही झालेली नाही. माहीम कॉजवे ते वांद्रे लिंक रोडदरम्यान काम दिसत नाही. धारावी ब्रिज ते वांद्रे लिंक रोड पट्ट्यातही अद्याप कामाचा पत्ता नाही.
एलबीएस रोड पट्ट्यात पाच किमी अंतरावर गाळ उपसा सुरू झालेला नाही, असे आझमी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.