

महापालिकेत ८७ हजार
जन्म-मृत्यू नोंदींमध्ये घोटाळा!
दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : महापालिकेच्या ८७ हजारांहून अधिक जन्म-मृत्यू नोंदींमध्ये अनियमितता समोर आली आहे. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी साटम यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्राद्वारे केली आहे.
आमदार साटम यांनी या घोटाळ्यामुळे शहराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महापालिकेच्या अहवालानुसार, २०२४ ते २०२६ या कालावधीत जन्म-मृत्यू नोंदीच्या ‘एसएपी’ प्रणालीद्वारे ८७ हजारांहून अधिक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व नोंदी ‘सीआरएस’ पोर्टलवर होणे बंधनकारक असताना, महापालिकेच्या ‘सॅप’ प्रणालीवर या नोंदी करण्यात आल्या. ‘सीआरएस’वर केवळ ३३ हजार ७७२ नोंदी असताना ‘सॅप’वरील ८७ हजारांचा आकडा मोठ्या घोटाळ्याकडे अंगुलीनिर्देश करीत असल्याचे साटम यांनी पत्रात नमूद केले आहे.
----
माहिती सार्वजनिक करा!
बनावट नोंदण्यांचे प्रभागनिहाय वर्गीकरण करून याची माहिती सार्वजनिक करावी. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीने सेवेतून निलंबित करावे. केवळ विभागीय चौकशी न करता त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात यावेत, अशी मागणी साटम यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.