

पश्चिम रेल्वेची विक्रमी दंडवसुली
विनातिकीट प्रवाशांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : विनातिकीट आणि अनियमित प्रवासावर आळा घालण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत पश्चिम रेल्वेने एप्रिल २०२६मध्ये विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. या महिन्यात तब्बल २७.३७ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, हा आतापर्यंतचा सर्वोच्च मासिक महसूल ठरला आहे.
यापूर्वी मे २०२२मध्ये २५.९८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. त्यापेक्षा यंदाचा आकडा पाच टक्क्यांहून अधिक वाढला आहे. या मोहिमेत ३.६० लाखांहून अधिक विनातिकीट आणि अनियमित प्रवासी आढळले. त्यांच्याकडून २७ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. हा महसूल एप्रिल २०२५मधील २१.८९ कोटी रुपयांच्या तुलनेत २५ टक्क्यांनी अधिक आहे. तसेच निश्चित केलेल्या २४.०७ कोटी रुपयांच्या उद्दिष्टापेक्षा १३ टक्क्यांनी जास्त वसुली करण्यात आली आहे. विभागनिहाय कामगिरीत मुंबई सेंट्रल विभागाने १३.०६ कोटी रुपयांची कमाई करीत आघाडी घेतली. त्यानंतर अहमदाबाद विभागाने ४.२२ कोटी, तर रतलाम विभागाने ३.४१ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला. या सर्व विभागांनी गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च कामगिरी केली आहे.
...
एसी लोकलमध्ये फुकटे
एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. एप्रिल महिन्यात अशा १४ हजारांहून अधिक प्रवाशांकडून ४४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत ११७ टक्क्यांनी अधिक आहे. मुंबई उपनगरी मार्गावरच एप्रिलमध्ये १.१ लाख विनातिकीट व अनियमित प्रवासी आढळले. त्यांच्याकडून सहा कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.