पावसाळापूर्व कामांपेक्षा व्हीआयपी दौऱ्यांची चर्चा

पावसाळापूर्व कामांपेक्षा व्हीआयपी दौऱ्यांची चर्चा
Published on

पावसाळापूर्व कामांपेक्षा व्हीआयपी दौऱ्यांची चर्चा
सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
मुंबई, ता. ७ : मुंबईत पावसाळा पूर्व कामांची लगबग सुरू झाली असली, तरी यंदा नालेसफाईच्या कामांपेक्षा व्हीआयपी दौऱ्यांचीच चर्चा अधिक रंगू लागली आहे.
आधी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, त्यानंतर महापौर रितू तावडे आणि आता उपमहापौर संजय घाडी यांनी नालेसफाईची पाहणी केली आहे. मात्र, प्रत्यक्षात जमिनीवर नालेसफाईची गती संथ असल्याचे चित्र असून, आता विरोधकांनीही या पाहणी सत्रात उडी घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात नालेसफाईवरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
विरोधी पक्षाने लवकरच स्वतंत्र नालेसफाई पाहणी दौरा आयोजित करण्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात पालिका आयुक्तांना पत्र दिले जाणार असून, प्रशासनाकडून होणाऱ्या टक्केवारीच्या दाव्यांची पोलखोल विरोधक करण्याची शक्यता आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर असताना मिठी नदीची सफाई केवळ ३५ टक्के होणे, ही धोक्याची घंटा मानली जात आहे. ​महापौर रितू तावडे यांनी भांडुप, मुलुंड आणि घाटकोपरमधील नाल्यांची पाहणी केली. ३१ मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले असले तरी, प्रत्यक्षात अनेक नाल्यांमध्ये गाळाचे ढीग तसेच आहेत. आम्ही प्रत्येक नाल्यावर जाऊन कामाची पोलखोल करू, असा इशारा काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी दिला आहे.

​पैशाचा चुराडा
सत्ताधारी केवळ फोटोंसाठी दौरे करत आहेत. नालेसफाईच्या नावाखाली मुंबईकरांच्या पैशाचा चुराडा सुरू आहे. आम्ही जेव्हा प्रत्यक्ष नाल्यावर उतरू, तेव्हा कळेल की पालिकेचा टक्केवारीचा आकडा किती फुगवलेला आहे. मुंबईकरांना पावसाळ्यात तुंबलेल्या पाण्यात सोडले, तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेत्‍या किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com