आकाशात उमटणार महामानवाची गाथा; २००० ड्रोनचा भव्य शो आणि सांस्कृतिक सोहळा

आकाशात उमटणार महामानवाची गाथा; २००० ड्रोनचा भव्य शो आणि सांस्कृतिक सोहळा
Published on

आकाशात उमटणार महामानवाची गाथा; २००० ड्रोनचा भव्य शो आणि सांस्कृतिक सोहळा
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ७ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंती उत्सवानिमित्त मुंबईत प्रथमच एका अभूतपूर्व ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. आंबेडकरांना अनोखे अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दादरच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर रविवारी (ता. १०) सायंकाळी ७ वाजता हा सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे २००० ड्रोनच्या माध्यमातून आकाशात साकारली जाणारी प्रकाशचित्रे. यामध्ये प्रामुख्याने ​महामानवाची प्रकाशचित्रे प्रज्वलित होणार असून, यात डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे बघायला मिळतील. याचबरोबर भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित करणारी विलोभनीय दृश्ये, महामानवाने केलेल्या सामाजिक क्रांतीचा प्रवास ड्रोनच्या माध्यमातून आकाशात जिवंत केला जाणार आहे.
​ ​या ऐतिहासिक सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ड्रोन शो सोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून, महामानवाच्या विचारांचा जागर या माध्यमातून केला जाणार आहे.
​महाराष्ट्र शासनाने या कार्यक्रमासाठी क्यूआर कोड जारी केला असून, तो स्कॅन करून नागरिकांना कार्यक्रमाची अधिक माहिती मिळवता येणार आहे. ​मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रोनचा वापर करून महामानवाला मानवंदना दिली जाणार असल्याने, हा सोहळा पाहण्यासाठी जनसागर लोटण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com