आठ कोटींचा प्रकल्प वापराविना धूळ खात!

आठ कोटींचा प्रकल्प वापराविना धूळ खात!
Published on

आठ कोटींचा प्रकल्प वापराविना धूळखात!
नगरसेवक पडवळ यांचा आरोप

मुंबई, ता. ७ : मुंबई महापालिकेच्या कूपर रुग्णालयात २०२४मध्ये सुरू करण्यात आलेला केंद्रीय निर्जंतुकीकरण सेवा विभाग प्रकल्प सध्या वापराविना धूळखात पडल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी केला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे सात ते आठ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता.
पडवळ यांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्प सुरू करताना रुग्णालयातील कोणत्याही विभागप्रमुखाकडून मागणीपत्र घेण्यात आले नाही. तसेच प्रकल्पासाठी आवश्यक असलेले ‘रिअजेन्ट्स’ किंवा विक्रीयक द्रव्ये खरेदी न करताच निविदा काढण्यात आली. त्यामुळे प्रकल्प प्रत्यक्षात सुरूच होऊ शकला नाही. प्रकल्प बंद असतानाही त्यासाठीच्या मनुष्यबळाचे पैसे महापालिका नियमितपणे कंत्राटदाराला देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मागील दोन वर्षांत या प्रकल्पातून रुग्णालयाला कोणताही फायदा झालेला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, याच धर्तीवर के. ई. एम. रुग्णालय येथे १५ ते २० कोटी रुपयांचा नवीन प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. केईएमच्या निविदेतही आवश्यक ‘रिअजेन्ट्स’चा समावेश नसल्याने कूपरप्रमाणेच हा प्रकल्पही निष्प्रभ ठरेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. केईएममध्ये आधीच विविध विभागांचे स्वतंत्र निर्जंतुकीकरण विभाग कार्यरत असताना नव्या प्रकल्पाची गरज काय, असा सवाल पडवळ यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच केईएममधील निविदा प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com